धाराशिव (प्रतिनिधी)-निशिगंधा पाटील यांची भाजपा महिला मोर्चा तुळजापूर तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे जिप च्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी अभिनंदन करुन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
काक्रंबा, ता.तुळजापूर येथील गेली 4 टर्म ग्रामपंचायत सदस्या असलेल्या सौ.निशिगंधा उमेश पाटील यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.निशिगंधा पाटील यांचा स्वतःचा दूधाचा व्यवसाय आहे. त्यांचा आदर्श घेऊन गावातील अनेक महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केले आहेत. बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी गावातील अनेक महिलांचे संघटन केले असून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली आहे. समाजकार्यात सक्रिय असलेल्या निशिगंधा पाटील यांनी तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री.राणाजगजितसिंह पाटील आणि जिप च्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या कामावर प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीत कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या अनुषंगाने आपण त्यांच्यावर पक्ष कार्याची जबाबदारी सोपवली आहे.
याप्रसंगी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा नंदाताई पुनगुडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, काक्रंबा गावातील प्रमुख महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.