नळदुर्ग (प्रतिनिधी)- युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफील मौलवी यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथील जि. प.प्रशाला, जि. प.केंद्रीय प्राथमिक शाळा, जि. प.कन्या प्रशाला व जि. प.उर्दु प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर आपलं घर प्रकल्पातील अनाथ मुलांना व मुकबधीर शाळेतील मुलांना भोजन देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे किल्ल्यातील जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी यांनी केले होते.
दि.17 ऑक्टोबर रोजी युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफील मौलवी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व विविध समाजपयोगी कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. नळदुर्ग येथेही कफील मौलवी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरांतील जि. प.प्रशाला जि. प.केंद्रीय प्राथमिक शाळा, जि. प.कन्या प्रशाला व जि. प.उर्दु प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. जि. प.प्रशालेच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, माजी नगराध्यक्ष नितीन कासार, मुश्ताक कुरेशी, माजी नगरसेवक बसवराज धरणे, सुधीर हजारे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकुर,शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, लतिफ शेख दादासाहेब बनसोडे, भगवंत सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव,अमर भाळे, व्यापारी गणेश मंडळाचे अध्यक्ष उमेश जाधव, प्रदीपसिंग ठाकुर,शिवसेनेचे बंडप्पा कसेकर,आदीजन उपस्थित होते. प्रारंभी शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना कमलाकर चव्हाण, तानाजी जाधव, मुश्ताक कुरेशी व सहशिक्षिका कविता पुदाले यांनी कफील मौलवी यांच्या सामाजिक तसेच त्यांनी किल्ल्यात केलेल्या कामांचे कौतुक केले. प्रास्ताविक युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी यांनी करताना कफील मौलवी यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री इनामदार, सहशिक्षक श्रीमती मैंदर्गी,श्रीमती हन्नूरे झेड. एम.,श्रीमती सय्यद टी. एम.,श्रीमती दुगम ए.आर.,श्रीमती कुलकर्णी ए.जी.,श्रीमती दखनी एस. ए.,श्रीमती नागणे एस. एस.,श्रीमती मदारसे के. वाय.,श्री जाधव एस. एस. श्री कदम व्ही. एन.श्री लोहार ए.ए., परीचर युसुफ शेख यांच्यासह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.