धाराशिव (प्रतिनिधी)-नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे जिल्हा नियोजन समिती ची बैठक पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत  जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून धाराशिव नगरपालिकेस दिलेला विकास निधी हा गेली 3 वर्षा पासून अखर्चीक आहे. तो खर्च करून प्रस्ताविक विकास कामे मार्गी लावावीत. जिल्ह्यात चालू वर्षी पाऊस 60 टक्के झालेला असून त्यामुळे भविष्यात पाणी व चारा टंचाई चे भयावह संकट येऊ शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आताच उपाययोजना हाती घेवून त्या अनुषंगाने नियोजन करावे. राष्ट्रीय पेय जल योजनेतून प्राधान्याने विहिरीची कामे हाती घ्यावीत. रोजगार हमी योजनेतून लातूर प्रमाणे कामे आपल्या जिल्हयातही सुरु करावी. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस मंजूर असलेल्या निधीतून रोहीत्र (ट्रान्सफार्मर) बसवण्याची कामे तात्काळ पुर्ण करावीत. धाराशिव शहराला होणारा पाणीपुरवठा हा सद्या आठवड्यातून एकदा होत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले शहराचा पाणी पुरवठा आठवड्यातून दोन वेळेस नियमीतपणे करावा.

जिल्हा वार्षीक नियोजन समीतीच्या बैठकीस जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील, विधान परिषद आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे, जिल्हा परिषदचे  मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्त, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.


 
Top