धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्हयातून भारत सरकारच्या भारत परीमाल योजने अंतर्गत सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग  प्रस्तावित आहे. सदर महामार्गाचे सर्वेक्षणाचे काम पुर्ण झाले असून सदर महामार्ग भुसंपादन प्रक्रिया सुरु आहे. शेतकऱ्यांचे भुसंपादित प्रकरणा संदर्भात काही तक्रारी व समस्या असून सदर तक्रारी निवारण करण्याच्या संदर्भामध्ये नियोजन विभागाचे सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे दि. 19/10/2023 रोजी सकाळी ठिक 10.00 वा. शेतकरी व अधिकारी परीसंवादाचे आयोजन करण्यात आले असून सदर परी संवादास जिल्हाधिकारी, धाराशिव उपाधिक्षक भुमीअभिलेख, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर व संबंधीत अधिकारी उपस्थीत राहणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची जमीन भुसंपादित झालेली आहे व भुसंपादना संबंधी काही तक्रारी व समस्या आहे. आशा सर्व शेतकऱ्यांनी उपस्थीत राहण्याचे अव्हान करण्यात येत आहे. 


 
Top