वाशी (प्रतिनिधी)- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा आंदोलकांनी बसवरील सरकारच्या जाहिरातीवर असलेल्या मंत्र्यांच्या फोटोला काळे फासले. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी परिसर दणाणून गेले.
आरक्षण मुद्द्यावरुन आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याची मागणी करत आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत आंदोलन केले. यावेळी राज्य शासनाची. महाराष्ट्र इमारत व ईतर बाधकाम कामगार कल्याकारी मंडळ मुंबई बसवर लावलेल्या जाहिरातिवरील मंत्र्यांच्या फोटोला आंदोलकांनी काळे फासले.