वाशी (प्रतिनिधी)-तालुक्यातील 23 गावातून वंचित विकास जाणीव संघटनेच्या वतीने रामभाऊ लगाडे जागृती अभियान राबवत असून या अनुषंगाने अजिंक्य विद्या मंदिर वाशी येथे युवक युतीसाठी जागृती अभियान घेण्यात आले.
समाजातील महिला किशोर मुली निरासरीत दुर्बल घटकातील महिला विधवा परितक्त्या एकल गरजू स्त्रियांना माणूस म्हणून त्यांचा सामाजिक आर्थिक सांस्कृतिक स्थर सुधारण्यासाठी विविध कार्यक्रम राबवत आहेत यामध्ये महिलांच्या वैवाहिक तसेच कुटुंबिक समस्यावर योग्य मार्गदर्शन करणे महिलांना आरोग्य शिक्षणासाठी प्रयत्न करणे महिलांनी आत्मनिर्भर व्हावे यासाठी स्त्री पुरुष समानतेचे मूल्य समाजातील प्रत्येक स्तरावर रुजवणे कुमारवयीन मुला-मुलींना कुटुंब जीवन शिक्षण देणे तसेच त्यांच्या वयातील प्रश्नांना योग्य मार्गदर्शन करणे वस्ती पातळीवर स्त्री-पुरुषांमध्ये कायद्याविषयी जागृती निर्माण करणे अल्पवयीन मुलीच्या लग्नाचे प्रमाण वय वर्ष 18 करणे स्त्रियांचा घर शेती यामध्ये मालकी हक्कात नोंदी झाल्या पाहिजेत स्त्री भ्रूण हत्या संदर्भात कठोर कायदे व मुलीला जन्म देणे यासाठी लेख वाचवा अभियान राबवणे बे जबाबदार नवऱ्याला कायद्याचा बडगा दाखवून त्याचे परिवर्तन करणे स्त्री पुरुष समानतेविषयी जागृती करणे स्त्रियांना परितक्ता करणे हा गुन्हा आहे हे समजून संबंधित व्यक्तीस शिक्षा व्हावी यासाठी माहिती सरकारकडे पाठवणे महिलांना राजकारणात सक्रिय करणे व ग्राम सभेत त्यांचा सहभाग वाढवणे त्यांच्या नेतृत्व कौशल्यासाठी सर्वेक्षण प्रशिक्षण देणे अशी अभियान राबवणे चालू आहे या अनुषंगाने अजिंक्य विद्या मंदिर जगदाळे मामा प्राथमिक विद्यामंदिर जय भवानी विद्यामंदिर बावी संभाजी विद्यालय पिंपळगाव लिंगी आणि तालुक्यातील 23 गावातून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये श्री लक्ष्मीकांत पवार मुख्याध्यापक यांनी सूत्रसंचालन व संयोजन केले यावेळी श्री दळवे एस आर श्री माने आर आय श्री भराटे एल डी श्री शिंदे आर एम नाईकवाडी श्रीमती नाईकवाडे एम एम श्रीमती लावंड जे एम श्रीमती ढेपे आर टी श्रीमती झापूगडे एस बी श्रीमती श्रीमती शिंदे श्रीमती कुलकर्णी एम आर यांनी परिश्रम घेतले.