तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनीश्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देविजींचा छबिना ज्या वाहनांवर काढला जातो त्या वाहनांची रंगरंगोटीस सोमवार दि. 2 ऑक्टोबरपासुन  आरंभ झाला आहे.                             

श्री तुळजाभवानी मातेच्या  नवराञोत्सवात  नऊ दिवस पोर्णिमा कालावधीत  दोन दिवस असे अकरा दिवस  अकरा छबिना वाहनांन वर पारंपरिक वाद्यांच्या गजरात  छबिना काढण्यात येतो. छबिनासाठी  वाहनांची निवड नक्षत्राचा आधार घेऊन केली जाते. सदरील छबिना वाहने गरुड, मोर, हत्ती, सिंह, वाघ, नंदी  सह अन्य  विविध तयार करण्यात आलेल्या वाहनांवर काढला जातो. छबिनासाठी लागणारे वाहने भाविक अर्पण करतात. छबिना वाहन खराब झाले की त्यावर छबिना काढला जात नाही. लागणाऱ्या वाहनांची नवराञोत्सव पुर्वी दुरुस्ती रंगरंगोटी केली जाते. 

छबिना वाहनांवर चांदीचे सिंहासन ठेवुन त्यात देविजीची चांदीची प्रतिकात्मक मुर्ती व चांदीच्या पादुका ठेवुन सदरील छबिना वाहन भाविक देविची सेवा म्हणून आपल्या खांद्यावर घेवुन मंदिर प्रांगणात प्रदक्षिणा मारुन छबिना काढलो जातो. यावेळी संभळाच्या कडकडाटात देवीचे कवन गीत गायले जातात  व यावेळी भाविक पोताने छबिना वाहनावरील देविला ओवाळुन छबिना सेवा पोहचले समजुन गावी समाधानाने जातात. अश्विन पोर्णिमा दिनी  मानाचा छबिना सोलापूरच्या शिवलाड समाजाच्या काठ्यांसह काढला जातो. काठ्यांसह  छबिना काढण्याची परंपरा चारशे वर्षापासुन असल्याचे बोलले जाते. सध्या या काठ्या हातावर पेलण्याचा सराव सुरु आहे.


 
Top