धाराशिव (प्रतिनिधी)-विद्यार्थी नेता म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे काम करताना गोपीनाथ मुंडे यांनी भाजपमध्ये घेतले. तेव्हा पासून भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. कर्मभूमी संभाजीनगर असले तरी आपल्या गावाची ओढ म्हणून मुरूम येथे आलो आहे. त्यामुळे धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक असून, भाजपाच्या निकषात आपण बसतो. त्यामुळे उमेदवारी मिळेल असा दावा भाजपचे बसवराज मंगरूळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.

मंगळवार दि. 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेस भाजपाचे ॲड. खंडेराव चौरे उपस्थित होते. पुढे बोलताना बसवराज मंगरूळे यांनी आपण उमेदवारी नाही मिळल्यास आपण पक्षाचे काम करीत राहो. धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्याला संधी मिळल्यास संधीचे सोने करू असे सांगून मंगरूळे यांनी शेतीपूरक उद्योग, दुध प्लॅन्ट, वायनरी या मोठ्या प्रमाणात याला जिल्ह्यात संधी आहे असे सांगितले. आपण आतापर्यंत 73 गावात 375 आधार कार्ड कॅम्प घेतले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा संपर्क होत आहे. त्याचप्रमाणे आमदार राणाजगजितसिंह पाटील, ॲड. मिलिंद पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या सोबतही अधूनमधून आपल्या बैठका होत असतात असेही मंगरूळे यांनी सांगितले.


 
Top