निकाल लागल्याशिवाय नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याचे काम करू नये
नळदुर्ग (प्रतिनिधी)- न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर निकाल झाल्याशिवाय नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याचे काम करण्यात येऊ नये तसेच शेतकऱ्यांची बदनामी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात दि.2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र.652 नळदुर्ग-अक्कलकोट शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने नळदुर्ग येथील ऐतिहासिक अलियाबाद पुलातील पाण्यामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे सदस्य खोल पाण्यात उतरले होते. यावेळी सोलापुर येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे उपअभियंता ए.ए.खैरदी यांनी न्यायालयाच्या आदेशानंतरच रस्त्याचे काम हाती घेण्यात येईल तोपर्यंत सदरील रस्त्यावर काम हाती घेतले जाणार नाही असे लेखी पत्र दिल्यानंतर शेतकरी संघर्ष समितीने आपले जल समाधी आंदोलन मागे घेतले.
यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सरदारसिंग ठाकुर यांच्यासह दिलीप जोशी, चंद्रकांत शिंदे, महादेव बिराजदार, विक्रम निकम, अजमोद्दीन शेख, रहेमान शेख, शहानवाज शेख, प्रताप ठाकुर, गणपती सुरवसे व मकबुल मुल्ला हे खोल पाण्यात उतरले होते. जलसमाधी आंदोलनात कांही विपरीत घटना घडु नये यासाठी प्रशासनाने पुर्ण खबरदारी घेतली होती. पाण्यात बोट सज्ज ठेवली होती. तसेच दोन रुग्णवाहिका व अग्निशमन दलाचे वाहन याठिकाणी सज्ज ठेवले होते. त्याचबरोबर नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे हे स्वतःआंदोलनस्थळी उपस्थित राहुन आंदोलनस्थळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी बंडू मोरे, दयानंद कल्याणशेट्टी,दयानंद लोहार, राजु पवार,सुभाष मोरे, श्रीकांत पोतदार, चंद्रकांत शिंदे, दिलिप जोशी, प्रताप ठाकुर, बालाजी ठाकुर, प्रताप शिवगुंडे, बाबुसिंग राजपुत, नानासाहेब पाटील,सैफन मुल्ला गफूर मुल्ला,दिलिप पाटील, व्यंकट पाटील,रहेमान शेख,काशिनाथ काळे, शहानवाज शेख,दिगंबर मोरे, सचिन जवळगे,गुलाब शिंदे, महादेव बिराजदार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.