धाराशिव (प्रतिनिधी)-तालुक्यातील देवळाली येथे दि.25 सप्टेंबर 2023 रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.
देवळाली येथे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या दिनानिमीत्त मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 159 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 777 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे हारी भिंगडे, आण्णा सुर्यवंशी, सलीम नाईकवाडी, प्रशांत सुर्यवंशी, विशाल आनंदे, प्रथ्वीराज देशमुख, दादा भिंगडे, सुधीर शिंदे, महेश क्षिरसागर, अविष्कार भिंगडे, पवन भालेकर, प्रतिक भिंगडे, प्रमोद शिंदे, अमोल सुर्यवंशी, अवगेरा बनसोडे, अक्षय भिंगडे, शिवाजी आनंदे, तानाजी राऊत, संजय गवळी, सुधाकर भिंगडे इत्यादी ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.नयन लोढा, डॉ. अभिषेक पगारे, डॉ.तेजस कदम, डॉ. नम्रता जयस्वाल, डॉ. जोत्सना दमाने यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे व आशा कार्यकर्त्या यांनी परिश्रम घेतले.