परंडा (प्रतिनिधी) -तालुक्यातील लोणी येथील ग्रामपंचायत वर भाजपाचा झेंडा लागला असुन सरपंच पदी सविता विकास केमदारणे तर उपसरपंचपदी राधिका प्रविण केमदारणे यांची निवड झाल्याबद्दल माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. जहीर चौधरी, सुखदेव टोंपे, ॲड.गणेश खरसडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद रगडे, ॲड. भालचंद्र औसरे, अजित काकडे, मनोज पवार, नागेश शिंदे, धनंजय काळे, हरिदास हावळे, गौरव पाटील, विकास केमदारणे, प्रविण केमदारणे, शंकर घुबडे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.


 
Top