तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मंदिरची पोर्णिमेचे धार्मिक विधी रविवार दि. 29 ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थानने पोणिमेचे विधी खालील प्रमाणे होणार असल्याचे जाहीर केले आहे. शनिवार दि 28/10/2023 रोजीची प्रक्षाळ पुजा राञी- 11-00 ते11-30, राञी मंदीर बंद- 11-30ते12-00, रविवार दि. 29 ऑक्टोबर रोजी पहाटे श्री देविजींचा कडी दरवाजा उघडणे- 12-00ते12-05,
चरणतिर्थ-12-05 ते 12-08, घाट देणे व पुजेस हाक - 12-08 ते 12-010, पुजारी श्री देविजजवळ येणे व निर्माल्य विसर्जन- 12-10 ते 12-15, श्री देविजींची मंचकावरुन सिंहासनावर प्रतिष्ठापना- 12-25 ते 12-35, धार्मिक विधी (पालखीवाले)- 12-45 ते 12-55, शुध्द स्नान-12-55 ते 01-00 देव सोवळ्यात ठेवणे- 01-05 ते 02 25, पंचामृत स्नान, शुध्द स्नान, आरती, धुपारती मेन बसविणे वगैरे -02-25ते 04-30 श्री देविजींची नित्याची सकाळची पुजा सकाळी- 06-00, श्री देविजींची सायंकाळची पुजा आरंभ- 07-00 सोलापूरच्या काठ्यांसह छबिन्याची मिरवणूक व जोगवा 11-00 वा.