उमरगा (प्रतिनिधी)- प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबई शाखा किल्लारी तर्फे उमरगा तालुक्यातील 11 आरोग्य केंद्राना 12 ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर भेट देण्यात आली. करोना काळात ऑक्सीजनच्या अभावामुळे अनेक रुग्नांना आपला जीव गमवावा लागला याची जाणीव ठेवून प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबई तर्फे राज्यात अनेक जिल्यात ऑक्सीजन संचाची मदत करून अनेकांचा जीव वाचवला आहे.
ग्रामिन भागातील रुग्नांना वेळेवर ऑक्सीजन मिळत नसल्याने गंभीर परिस्थितीशी सामना करावा लागतो. याची दखल प्रथम फांउडेशन किल्लारी या मराठवाडा विभागीय शाखेतर्फे उमरगा तालुक्यातील मुरुम, कसगी, डिग्गी, आलूर, उमरगा, मुळज, नाईचाकूर, गुंजोटी, औराद, एकूरगा येणेगूर येथील आरोग्य केंद्राना ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर संचभेट देण्यात आली.
शहरातील पंचायत समिती सुभागृहात आशा कार्यकर्ते मेळाव्यात प्रथम किल्लारी शाखेचे प्रमुख बालाजी भालेराव यांचे अध्यक्षेतेखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ नंदकुमार नेहरकर यांच्या हस्ते आक्सीजन संच देण्यात आले. यावेळी प्रथम संस्थेचे जिल्हा संपर्क अधिकारी सुमीत कोथिंबिरे, ट्रेनर दिनेश धुळे, तुषार निधानकर, बालाप्रसाद पाचंगे, डॉ रंगनाथ आदनाक, डिग्गीच्या रुरपंच सौ आशाताई लिंबारे, आलूरच्या सुरपंच सौ लिलावती जेवरे, कसगीचे सरपंच हानुमंत गुरव हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष तगरखेडे व आभार प्रदर्शन अमित लोखंडे यांनी केले.