उमरगा (प्रतिनिधी)- शहरातील तुळजाभवानी मित्र मंडळाच्या वतीने तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी मान्यवराच्या हस्ते महाप्रसादाचा प्रारंभ रविवारी दि. 15 रोजी करण्यात आला.                                      

मागील 23 वर्षापासून माजी नगरसेवक बाबुराव सगर व भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष कैलास शिंदे यांच्या संकल्पनेने शहरातील अंतुबळी पतंगे सभागृहा समोर तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी दहा दिवस महाप्रसाद व निवासाची व्यवस्था केली जाते. या महाप्रसादाचा प्रारंभ जहीराबाद ते तुळजापूर जाणाऱ्या भाविकांना महाप्रसाद देऊन करण्यात आला. प्रारंभी भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, शिवसेना युवा नेते किरण गायकवाड,भाजपा तालुका अध्यक्ष शहाजी पाटील, मित्र मंडळाचे अध्यक्ष कैलास शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार झाला.                          

यावेळी बाबुराव सगर, योगेश तपसाळे, शरद पवार, गोपाळ जाधव, बंडू साळुंखे, मल्लिनाथ कलशेट्टी, बालाजी जाधव,देविदास चव्हाण, बसु घोडके, शंतनू सगर, गोपाळ घोडके, हनुमंत दंडगुले, आनंद पाटील, मंगेश गायकवाड, नागेश घोडके, अनिल चव्हाण, पप्पू माने, इराप्पा घोडके, अनुज सगर, विजय केशवशेट्टी, यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथे दररोज किमान 7 हजार भाविक प्रसाद ग्रहण करतात. मंडळाचे पदाधिकारी 24 तास ही अन्नदानाची सेवा सातत्याने करीत असतात.


 
Top