तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद उद्रू प्रशालेतील प्रभारी मुख्याध्यापिका अर्शिया शेख यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना जिल्हा लातूर यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण लातूर येथे करण्यात आले.यावेळी शिक्षक आ विक्रम काळे  व शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष एम. ए. गफार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोईज शेख यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी पुरस्कार सोहळ्याचे आयोजक  नुसरत कादरी, मराठवाडा अध्यक्ष अ. राफे, कार्याध्यक्ष अब्बास शेख, धाराशिव जिल्हा उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तय्यबअली शहा, जिल्हा सचिव सय्यद नईमुद्दीन सय्यद,  साजिद शेख, कलीम मोमीन, कामरानबेग मिझा, मिनहाज शेख आदी उपस्थित होते.


 
Top