धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज प्रा. लि. या कारखान्याचा सन 2023-24 चा चाचणी गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा  दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता उत्साहात पार पडला. श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी व त्यांच्या पत्नी दिपाली कुलकर्णी यांच्या हस्ते मशिनरीचे विधिवत पूजन करुन बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.

या वर्षीच्या चाचणी गळीत हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने गाळप करून करुन परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे. सोहळ्यास खामसवाडीचे प्रथम नागरिक अमोल पाटील, वि.वि.का.सोसायटी चे चेअरमन संजय पाटील, तेरणा कारखान्याचे माजी संचालक दिलीप पाटील, ग्रा.पं.सदस्य नितीन बंडगर, नितीन भोसले, व्यंकटेश कोरे, प्रतिक देवळे, राजकुमार जाधव, अरविंद गोरे, बलराम कुलकर्णी, प्रकाश जोशी यांचेसह ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूक ठेकेदार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top