धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यात सर्व ठिकाणी 1 ऑक्टोंबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असा शासन निर्णय 26 सप्टेंबर 2023 रोजी जारी करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबीर, चर्चासत्र, परिसंवाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांची सहभागी व्हावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी.जी.अरवत यांनी केले आहे.