धाराशिव (प्रतिनिधी)-भांडारकर इन्स्टिट्यूट पुणे येथे भाजपा राज्य शिक्षक बैठकीमध्ये राज्य संयोजक प्रशम कोल्हे सर यांनी पुढील तिन वर्षासाठी धाराशिव जिल्हा भाजपा शिक्षक आघाडी संयोजक पदावर प्रा. विनोद राठोड यांना महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष आ.श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
पुणे येथे भाजपा शिक्षक आघाडीच्या बैठकीत उपस्थित राहून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान केली. त्यांचे अभिनंदन केले व पक्षातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे तसेच भाजपाचे विचार समाजापर्यंत पोहचवून राष्ट्रहित साधावे असे आवाहन केले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सचिव किरण पाटील, माजी आमदार मेधाताई कुलकर्णी, शिक्षक आघाडीचे महाराष्ट्र संयोजक प्रशम कोल्हे यांच्यासह शिक्षक आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.