धाराशिव (प्रतिनिधी)-मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत15 सप्टेंबर रोजी वॉकेथॉन (वॉक फॉर नेशन) आयोजित करण्यात आले आहे. दि.15 सप्टेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मृतीस्तंभाला अभिवादन करुन या वॉकेथॉनची सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक या मार्गे पुन:श्च जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी या वॉकेथॉनचे विसर्जन होणार आहे.या वॉकेथॉनमध्ये शाळा,महाविद्यालयाचे विद्यार्थी,स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांनी केले आहे.