धाराशिव (प्रतिनिधी)- रुपमाता उद्योग समूहाने धाराशिव जिल्ह्यात हरितक्रांती केली आहे. दूध डेअरी, गूळ पावडर उद्योग, पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य, शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला असल्याचे मत माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील पाडोळी (आ.) येथील रुपमाता नॅचरल शुगरच्या पाचव्या गळीत हंगामाचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर व भाजप जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य यांच्या हस्ते गुरुवारी (दि.28) करण्यात आला. 

या कार्यक्रमास रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव गुंड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष मिलिंद पाटील, किसान आघाडीचे पूर्व मराठवाडा अध्यक्ष रामदास कोळगे, कैलास शिंदे, सतीश देशमुख, डॉ. गोविंद कोकाटे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन भोसले, दत्ता सोनटक्के, रमेश रणदिवे, भाऊसाहेब गुंड, अजित गुंड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपामाता उद्योग समूहाचे संस्थपक अध्यक्ष व्यंकटराव गुंड यांनी केले. आभार कार्यकारी संचालक अजित गुंड यांनी मानले. कार्यक्रमाला रुपामाता उद्योग समुहातील अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top