तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथे डेंग्यूचे दोन रूग्न व चिकनगुनियाचा 1 रूग्न आढळल्याने नागरीकात खळबळ उडाली आहे.
धाराशिव तालुक्यातील तेर येथे डासांचे प्रमाण वाढले असून डेंग्यू सदृश्य 8 रूग्नाचे रक्ताचे नमुने बीड येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.त्यातील 2 रूग्नाना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.तर चिकनगुनियाचा 1 रुग्न आढळल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने पाणी साठ्यामध्ये आबटिंग करण्यात येत आहे. डास निर्मूलनासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
नागरिकांनी परिसर स्वच्छता -घराभोवती /परिसरात ज्यामध्ये पाणी साचू शकेल अशा निरुपयोगी वस्तू साचू देऊ नये त्या नष्ट कराव्यात, खराब टायर्स पंक्चर्स करावेत.,पंक्चर दुकानातील टायर्स त्यात पाणी साठणार नाही, अशा पध्दतीने रचावेत,पाण्याची भांडी, ड्रम, रांजण व्यवस्थित झाकून ठेवावेत. झाकण नसल्यास जुन्या कपडयाने झाकावेत, पाण्याची भांडी झाकल्याने त्यात डास अंडी घालू शकत नाहीत तसेच अंडयाची वाढ होण्यासाठी हवा, प्रकाश मिळू शकत नाही,घरावरील टाक्यांना झाकणे बसवावीत,.शौचालयांच्या व्हेंट पाईपला जाळी बसविवी,.आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा या दिवशी घरातील सर्व भांडी मोकळी करुन घासून पुसून घ्यावीत, परिसरातील डबकी वाहती करणे, बुजविणे, मोठया डबक्यात गप्पीमासे सोडणे व जे कंटेनर रिकामे करता येणार नाहीत. अशा कंटेनरमध्ये अळीनाशकाचा वापर करावा. असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र,जागजीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्राची माळी यांनी केले आहे.