कळंब (प्रतिनिधी)-कळंब तालुक्यातील प्रत्येक गावात बैल पोळा साजरा करण्यात आला.या सणवर दुष्काळाचे सावट  होते.पाऊस नसल्याने बाजार पेठ थंड आहेत.त्या मुळे पोळा सणावर याचा परिणाम झाला आहे.शेतकऱ्याला साथ देणाऱ्या बैला ची मनोभावी पूजा केली.पूर्वी प्रमाणे घरोघरी जनावरे असायची, बदलत्या परिस्थितीत नुसार आता, यंत्र आल्याने बैलाची संख्या बोटावर मोजण्याइतके झाली आहे.शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी आप्पा कापसे यांनी बैलजोडी ची पूजा केली,शेतकऱ्यांनी  बैलांची सजावट करून,त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढून, मारुती चे दर्शन घेवून,त्यांचे लग्न सोहळा पार पडला.

सद्या मराठा आरक्षण गाजत आहे, त्यात शासनाचा निषेध म्हणून, बैलावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, यांच्या निषेधाच्या पोस्ट तर मनोज जरांगे पाटील यांच्या  समर्थनात पोस्ट लिहून अनेक तरुणांनी बैल पोळा साजरा केला.

असमतोल पावसामुळे खरीप हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर आहे यामुळे चिंता तूर शेतकऱ्यांनी वर्षभर शेती कामासाठी साथ देणाऱ्या बैलाला सजवण्यासाठी हात आकडता घेतला आहे. यामुळे साहित्याने सजलेल्या बाजारपेठेत अपेक्षित अशी उलाढाल झाली नाही. बैलांना सजून पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालण्यात आला. शेतकरी हा सण रूढींपरंपरेने साजरा करतात. यंदा दुष्काळी परिस्थिती साजरा करावा लागत आहे.


 
Top