धाराशिव (प्रतिनिधी)- व्यक्तीला हिंदी भाषा अवगत असणे खूपच गरजेचे आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये बऱ्याच वेळा हिंदी भाषेचा वापर केला जातो. त्याचबरोबर राज्याच्या बाहेर गेल्यानंतर देखील आपणाला हिंदी भाषेमधून संवाद साधावा लागतो. त्यामुळे हिंदी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी केले.

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात 14 सप्टेंबर 2023 रोजी हिंदी विभागाच्या वतीने हिंदी भाषा दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. 14 सप्टेंबर 2023 पासून 21 सप्टेंबर 2023 पर्यंत हिंदी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. सदर सप्ताहामध्ये निबंध, वक्तृत्व आणि काव्यवाचन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख उद्घाटक म्हणून बोलत होते. 

याप्रसंगी हिंदी विभाग प्रमुख प्रा. श्रीराम नागरगोजे यांनी देखील हिंदी विषयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि प्रस्ताविक डॉ. केशव क्षीरसागर यांनी केले.कार्यक्रमाचे आभार हिंदी विभागातील प्रा. डॉ.माधुरी सोनटक्के यांनी मानले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील अनेक गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top