धाराशिव (प्रतिनिधी)-रोटरी क्लब उस्मानाबाद, धारासूर मर्दिनी महिला फेडरेशन, व वेंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव शहरात प्रकल्प ' निर्मल' राबविण्यात आला.

शहरातील दहा गणेश मंडळांच्या देखाव्यां जवळ मोठे ड्रम ठेवून त्यात निर्माल्या चे दर तीन दिवसांनी संकलन करून वेंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पा साठी देण्यात आले.

प्रत्येक ठिकाणी प्लॅस्टिक वापरासंबंधी माहिती देणारे बॅनर लावण्यात आले. या प्रकल्पासाठी रोटरी क्लब उस्मानाबाद च्या अध्यक्ष डॉ सौ अनार रवींद्र साळुंके,सचिव डॉ. सौ. मीना श्रीराम जिंतूरकर, प्रकल्प प्रमुख सुधाकर भोसले, सुरज कदम, रणजित रणदिवे, अभिजित पवार, संतोष शेटे, बाळासाहेब देशमुख,प्रविण काळे, संजय देशमाने, उदय तीर्थकर,धारासूर मर्दिनी महिला फेडरेशन च्या अध्यक्ष डॉ. रेखा ढगे, नीता कठारे, मेधा कुलकर्णी ,विनीता कुलकर्णी, अनुराधा तोडकरी, वेंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रशांत चौधरी, वनस्पती शास्त्र विभागाचे प्रा. अभय शिंदे, पप्पू यादव यांचा विशेष सहभाग होता. शहर स्वच्छता व पर्यावरण पूरक असा हा उपक्रम होता. यातून एक टन निर्माल्याचे संकलन झाले.


 
Top