उमरगा (प्रतिनिधी)-  राज्यात बचत गटाच्या माद्यमातून महिलांनी आर्थिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रगती केली असून ग्रामीण भागातील महिलांनी गृह व लघु उद्योगाची निर्मिती करून आपला आर्थिक विकास करावा असे विचार महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी शोभा कुलकर्णी  यांनी व्यक्त केले.

शोभा कुलकर्णी या उमरगा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ, माविम जिल्हा कार्यालय, धाराशिव द्वारा संचलित ज्ञानदिप लोकसंचलित साधन केंद्र, उमरगाच्या 10 वी वार्षिक सर्वसाधारण व महिला मेळाव्याच्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदेवी पाटील होत्या. यावेळी प्रमुख पाहुने तहसिलदार गोविंद येरमे, योगेश कंदले शाखाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र, उमरगा, डॉ. श्वेता सरपे, डॉ. निवेदिता बिराजदार, सुमित कोथिंबीरे, प्रथम फौंडेशन संपर्क अधिकार व धम्मचारी प्रज्ञाजीत अधिक्षक बहुजन हिताय विद्यार्थी वस्तीगृह, उमरगा हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक किशोर टोंपे व्यवस्थापक यांनी केले. तर सुञसंचलन सखु सोनकांबळे व नंदा कांबळे यांनी केले. जगदेवी पाटील यांनी अध्येक्षीय मार्गदर्शन केले.  शेवटी ममता पाटोळे यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग गायकवाड, स्वालेहा मुल्ला, महानंदा अगंबरे, अयोध्या बनसोडे, कोमल गायकवाड, ज्योती माने, विद्या कांबळे, राणी मोरे, छाया शिंदे, संगीता मुळे, कविता जाधव,अनुसया जाधव यांनी परिश्रम घेतले.



 
Top