धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सव वर्ष चालु असुन मराठवाडा मुक्ती संग्राम हा ख-या अर्थाने रक्तरंजित इतिहास आहे. ख-या अर्थाने हैदराबाद स्टेट निजामाच्या गुलामगिरीतुन मुक्त झाले व भारतात सामील झाले. हा सर्व इतिहास भारत मुक्ती संग्राम म्हणुन समोर आला. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सव समितीचे संयोजक, पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष तथा साहित्यिक युवराज बप्पा नळे यांनी लिहिलेले व जिल्हा प्रशासनाच्या सौजन्याने तयार करण्यात आलेले “मराठवाडा नव्हे, भारत मुक्ती संग्राम“ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे,जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते व स्वातंत्र्य सेनानी भास्करराव नायगावकर, बुबासाहेब जाधव, लेखक युवराज नळे व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. 

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी परिश्रमपूर्वक व अभ्यासपूर्ण पुस्तकाचे लेखन केल्याबद्दल लेखक युवराज नळे यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रशासनाच्या वतीने सत्कार केला.  तर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी आजच्या आयोजित कार्यक्रमाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र व 'मराठवाडा नव्हे भारत मुक्तिसंग्राम' हे पुस्तक अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी सा.प्र.संतोष भोर साहेब, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसिलदार प्रविण पांडे, शुभम काळे, तसेच साहित्यिक युवराज नळे व सौ.वर्षा नळे, शंकर नळे, संजीवनी नळे, डॉ अभय शहापुरकर, शेषाद्री डांगे, राजेंद्र अत्रे, प्रा. डॉ.सतीष कदम, नितीन तावडे, अमर हंगरगेकर, तसेच स्वातंत्र्यसैनिक पाल्य सुभाषदादा कोळगे, राजूशेठ अजमेरा, प्रकाश तोडकरी, उमाजी देशमुख, संभाजी देशमुख, संजय नायगावकर, तानाजी शिनगारे तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सेनानी व त्यांच्या परिवारातील सदस्य,जिल्हा प्रशासन,मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सव समिती व पर्यटन विकास समितीचे पदाधिकारी सह इतर मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वृषाली तेलोरे यांनी केले.


 
Top