तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह तालुक्यात कृषी संस्कृती तील बैलपोळा सण श्रावण अमावस्या दिनी गुरुवार दि 14 सप्टेंबर रोजी पारंपारिक पध्दतीने बैलजोड्यांचे पुजन करुन साजरा केला. श्री तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्यात नेवुन बैलजोडीचे पुजन महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजी बुजा, पाळीवाला पुजारी, सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले सह पूजारीवृंद उपस्थितीत होते.          

यंदाचा बैलपोळा सणावर दुष्काळ सावट दिसुन आली.  बैलपोळा सण पार्श्वभूमीवर सकाळ पासुन बैलजोडी सजविण्यास आरंभ करण्यात आला. सांयकाळी बैलजोडीस शेतकरी कुंटुंबाने पुरणपोळी खाऊ घालुन पुजन केले. नंतर ग्रामदेवतेच्या मंदिरात नेवुन श्रीफळ वाढवुन बैलजोडी घरी नेली. बैलपोळा निमित्ताने माजी मंञी चव्हाण यांनी केली बैलजोडीची पुजा ! यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण  व चव्हाण परिवारालतर्फे प्रति वर्षाप्रमाणे सण उत्साहात साजरा करण्यात आला. 


 
Top