तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर(खुर्द)  परिसरात सातत्याने चोरीच्या घटना घडुन मारहाण होण्याचे प्रकार वाढत असल्याने  या प्रकरणी चोरट्यांना पकडुन तात्काळ कारवाई करण्याची मागणी   तुळजापूर खुर्द भागातील रहिवाशांनी पोलिस निरीक्षक घाडगे यांना  निवेदन देवुन केली  

या प्रकरणी  योग्य ती कारवाई केली  जाईल गस्त वाढवली जाईल असे आश्वासन  पोलिस निरीक्षक घाडगे यांनी दिले.

युवा नेतेअजिंक्य नारायण  नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली  पो नि घाडगे यांना निवेदन दिले यावेळी घाडगे यांनी तुळजापूर (खुर्द), शिवरत्ननगर, नेताजी नगर, समर्थ नगर व तुळजाई नगर या भागात  ग्रामरक्षा दल नेमावे. त्यांना पोलीस प्रशासन  ओळखपञ  देऊन  गस्त घालण्याची परवानगी देईल. या भागात गस्त वाढवली जाईल तरीही शहरवासियांनी दक्षता घ्यावी  असे आवाहन  यावेळी पो नि घाडगे यांनी केले. यावेळी तुळजापूर खुर्द भागातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


 
Top