धाराशिव (प्रतिनिधी)-आगामी काळात गणेशोत्सवाहस ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवात पोलिस प्रशासनाच्या तयारीचा आढावा छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दि. 13 सप्टेंबर रोजी घेतला.यावेळी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेवून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पोलिस दल सुसज्ज असून, नागरिकांनी शांततेत उत्सव साजरा करावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

पाच दिवसांवर येवून ठेपलेला गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सण शांततेत पार पाडण्यासाठी जबाबदारी पोलिस प्रशासनाची आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पोलिस मुख्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलिस अधिकारी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले की, दोन्ही उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस मुख्यालय, उपविभागीय पोलिस कार्यालय, पोलिस ठाणे स्तरावर बैठका घेण्याच्या सुचना दिल्या, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी शांतता कमिटीची बैठक, गणेश मंडळाच्या बैठका घेण्याच्या सुचित केले. पोलिस विभागाकडून होत असलेल्या वृक्षलागवड मोहिमेची चव्हाण यांनी कौतुक केले. यावेळी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी येणाऱ्या काळात तगडे नियोजन करत असल्याचे सांगत अनुचित प्रकारावर आळा घालण्यासाठी गाव स्तरापर्यंत समन्वय ठेवण्यात येत असल्याचे सांगितले.


 
Top