धाराशिव  (प्रतिनिधी) - मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त उस्मानाबाद जिल्हयात  महिलांमध्ये कर्करोग तपासणी करीता मोबाईल वैद्यकिय युनिट्स हे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आले. यामध्ये 30 वर्षा वरील सर्व महिलांची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब व तीन प्रकारचे कर्करोग यामध्ये तोंडाचा कर्करोग, स्त्रीयामध्ये स्तनाचा कर्करोग व गर्भाशय मुखाचा कर्करोग याची तपासणी करण्यात येणार आहे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2023 रोजी या मोबाईल वैद्यकिय युनिट्सचे उद्घाटन करण्यात आले. व सर्व नागरिकांनी या तपासणीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.

ग्रामीण भागातील महिलांसाठी स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा देऊन माहिती आणि निदाना बाबत क्षमता यातील अंतर भरुन काढन्यासाठी तसेच पाच कमी किमतीची AI- आधारित वैद्यकिय उपकरणे, तपासणी करीता वेगळी सक्षम टीम आणि पूर्वनियोजित वेळापत्राकाद्वारे पुढिल वर्ष भरात 25000 महिलांच्या दारा पर्यंत पोहोचतील. तसेच NIRAMAI HEALTH Analytix  द्वारे विकसित केलेली ही नाविन्य पुर्ण साधने नॉन-इनवेसिव्ह उपकरणांद्वारे महिलांच्या स्तनाची तपासणीची प्रभावीता वाढवतील, जे स्वयंचलित कर्करोग तपासणी साधने म्हणून काम करतात.

जागतिक आरोग्य दिना निमित्त सुरु करण्यात आलेल्या “मिशन आनंदी“ अंतर्गत आरोग्य विभागा मार्फत असंसर्गजन्य रोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि तोंडाचा कर्करोग तसेच स्तनाचा आणि गर्भाशयाच्या ग्रीवासाठी 1,16,588 महिलांची तपासणी केली आहे आणि 1,08,778 महिलांची ॲनिमियासाठी तपासणी करण्यात आली आहे.

 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास यांनी महिलांची कर्करोग तपासणी करुन रोग निदान करुन टाळता येण्या जोग्या आणि उपचार करण्यास योग्य तसेच कॅन्सर मुळे होणारा मृत्यू आणि खिशातून होणारा खर्च कमी होईल असे सांगितले. तसेच जिल्हयातील महिलांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाला ही उच्चस्तरील निदान साधने उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा कटीबध्द आहे. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास व जिल्हा शल्य चिकित्कस डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी केले.


 
Top