तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्रीतुळजाभवानी मंदीर लगत असलेल्या शुक्रवार“  पेठ भागात सोमवार दि4 रोजी राञी अचानक विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने या भागातील रहिवाशांन  सह भाविकांना गैरसोयीस सामोरे जावे लागले.

शहरातील भाविकांची वर्दळअसणा-या शुद्ध पेठ पावणारा  गणपती मंदीर सह अनेक भागात सोमवारी राञी सवाआठ वाजता अचानक विद्युत पुरवठा खंडीत असल्याने या भागात अंधाराचे साम्राज्य पसरले मंदिरात जाणारे व देवदर्शन करुण येणाऱ्या भाविकांना अंधाराचा साम्राज्य मुळे निवासास्थान शोधताना ञास झाला. तसेच श्रावण सोमवार मध्ये शंभू महादेव मंदिरात जाणाऱ्या येणाऱ्या भक्तांचे तसेच याभागातील रहिवाशांना या अंधाराचा साम्राज्याचा ञास सहन करावा लागला.


 
Top