तुळजापूर (प्रतिनिधी)- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरू  असलेल्या आंदोलनातील सहभागी मराठा समाजातील बंधू-भगिनी वर करण्यात आलेल्या  लाटी हल्ला निषेधार्थ सोमवार दि. 4 रोजी तुळजापूर  सोलापूरमहामार्ग रस्त्यावर माळुंब्रा गावानजीक रस्ता रोको करण्यात आला. या लाटी हल्ल्यात यामध्ये अनेक समाज बांधव गंभीरपणे जखमी झाले. या गोष्टीच्या निषेधार्थ व मराठा समाजाच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ मौजे माळुंब्रा येथे मराठा समाज च्या वतीने राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात  ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. आज दि. 4 सप्टेंबर वार सोमवारी मौजे माळुंब्रा येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.52 वर मराठा तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले.  मराठा समाज बांधवानी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या नावाने घोषणा दिल्या व जय भवानी-जय शिवराय, एक मराठा-लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, जालना जिल्ह्यात लाटीचार्जे वर दोषी असणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

या वेळी अत्यंत  शिष्त बद्ध परंतु तेवढ्याच आक्रमक भावनेतून जवळपास एक तास रास्ता अडवण्यात आला. यावेळी गजानन वडणे,समाधान वडणे,देवानंद वडणे,जगदिश वडणे,महेश वडणे आदींनी भावना व्यक्त केल्या. हा रास्ता रोको यशस्वी होण्यासाठी प्रदीप वडणे,कृष्णा गाटे, सूरज वडणे,निखिल गाटे,सतीश आतकरे, अजित वडणे, ज्ञानेश्वर वडणे,अमोल वडणेआदींनी परिश्रम घेतले, यावेळी गावातील बहुसंख्य युवक उपस्थित होते. यापुढे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने लढा सुरु ठेवायचा निर्धार करण्यात आला.


 
Top