धाराशिव (प्रतिनिधी)-दखल प्रकाशनाच्या “लोकसभेत मराठवाडा“ या पुस्तकाचे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर ,माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, संपतराव डोके, कळंबचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग कुंभार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हा. चेरमन कैलास शिंदे, सिंधुजन अकादमीचे डॉ .सुजित शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
याच कार्यक्रमात दखल प्रकाशन व शिंदे परिवार याच्या वतीने सेवानिवृत्त झालेले सुभाष पवार, राजीव नाईकनवरे, बाळासाहेब गोरे, प्रभाकर चोराखळीकर, सुनील भातलवंडे आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास चंद्रकांत शिंदे, मुकुंदराव चौधरी, ओहळ, सुनील काळे, युवा सेनेचे अक्षय ढोबळे, तेली महासंघाचे रवी कोरे, विर, संतोष खोचरे, मुन्ना शेख, सतीश शिंदे, बालाजी सावंत, सज्जन मते आदी मान्यवर उपस्थित होते.