धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. धाराशिव या संस्थेची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा  अध्यक्ष विवेक यशवंतराव डांगे  यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. तसेच सभेचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष धनंजय भारतराव हाजगुडे यांनी केले.

सभेला संस्थेचे संचालक विनोद हनुमंतराव डोंगरे, रमेश निवृत्ती वाघ, मोहन मुकुंदराव पवार, श्रीराम पंढरीनाथ सुडे, उद्धव तुळशीराम मुळे, किरण किसनराव सोमवंशी, शेख आयुब फकीरसाब, लक्ष्मण प्रल्हाद पोतदार, श्रीमती चंद्रशेखर नलगुलवार श्रीमती लता बाळासाहेब जगदाळे व सर्व संस्थेची सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहवाल वाचन संस्थेचे संचालक सचिव शेख आयुब फकीरसाब यांनी केले व संस्थेचे अध्यक्ष विवेक डांगे यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला व संस्थेच्या सभासदांना या वर्षी सभासदांच्या भाग भांडवलावर 9% लाभांश जाहीर केला यापुढेही संस्थेची प्रगती बाबत आम्ही सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले.

यानंतर शेवटी संचालक सचिव शेख आयुब फकीरसाब यांनी उपस्थित सर्व संचालक मंडळ व सर्व सन्माननीय सभासदांचे आभार मानून सभा संपन्न असे जाहीर केले.


 
Top