धाराशिव (प्रतिनिधी)-रोटरी सेवा ट्रस्ट उस्मानाबाद संचलित जे. एफ. अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालय व राज्य परिवहन विभाग उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 सप्टेंबर रोजी धाराशिव आगारात बस चालकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. हे तपासणी शिबिर 1 ते 3 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील खाजगी बसचे चालक, ट्रकचालक व एस टी बसचे चालक यांच्या साठी ही तपासणी मोफत आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी रोटरी क्लब उस्मानाबाद च्या सचिव डॉ. मीना श्रीराम जिंतूरकर व माजी अध्यक्ष प्रमोद दंडवते व  जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. रोटरी नेत्र रूग्णालयाचे कर्मचारी ही नेत्र तपासणी करीत आहेत.


 
Top