तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव वर्ष निमित्ताने जनसेवक अमोल कुतवळ यांच्या वतीने घेण्यात चित्रकला स्पर्धेत33शाळैतील 1617 विध्यार्थांनी सहभाग नोंदवला नगरपरिषद शाळा क्रमांक 2 येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेचे उदघाटन पोलीस निरीक्षक गजानन घाडगे,काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील,जेष्ठ नेते शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोकराव मगर,माधवराव आण्णा कुतवळ, शिवभवानी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रवीण कदम मुख्याध्यापक गणेश रोचकरी यांच्या हस्ते देवीची प्रतिमा व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहशिक्षक महेंद्र कावरे, सुरजमल शेटे ,महेंद्र पाटील,केरन लोहारे, सुज्ञानी गिराम, ऐश्वर्या जाधव, विद्यादेवी स्वामी, छोटू पाटील, सुनील मामा शिंदे, बिरु आप्पा माने, विकास चव्हाण, औदुंबर करंडे, आण्णा गोंडगिरे, अब्दुल शेख, जफर शेख, पप्पू पवार, प्रमोद भोरे, पप्पू कांबळे, अजय काटकर, गणेश अमृतराव, सलमान शेख, अजय धनके, नितीन गुंजाळ, इ जणांचे सहकार्य लाभले. स्पर्धेचे सूत्रसंचालन कुणाल रोंगे यांनी तर प्रास्ताविक श्रेयस कुतवळ तर आभार जनसेवक अमोल कुतवळ यांनी मांडले. स्पर्धेत या स्पर्धेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला विशेषता पायाने पायाला ऑपरेशन झालेली व प्लास्टर झालेली विद्यार्थिनी कु. तमन्ना जावेद शेख यांनीही आपला सहभाग नोंदवला.