धाराशिव (प्रतिनिधी)- रोटरी क्लब उस्मानाबाद, एम्क्युअर फार्मास्युटिकल्स व गांधी मेडिकल स्टोअर्स यांच्या वतीने एमआयडीसी येथील दोन कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या 50 कामगार स्त्री पुरूषांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांना गांधी मेडिकल स्टोअर्स यांच्या तर्फे मोफत रक्त वाढीच्या गोळ्या देण्यात आल्या. हा उपक्रम इतर कारखान्यां मधील कामगारांसाठी सुरू राहणार आहे.
हा उपक्रम अक्षय मेटल इंडस्ट्री येथे घेण्यात आला. या वेळी रोटरी क्लबच्या सचिव डॉ. सौ. मीना श्रीराम जिंतूरकर, कोषाध्यक्ष किरण संजय देशमाने, रोटेरियन संजय देशमाने, व अक्षय मेटल इंडस्ट्रीच्या सौ. स्मिता संतोष शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.