धाराशिव (प्रतिनिधी)-निवडणुका न घेणे, ऑडीट रिपोर्ट सादर न करणे, चेंज रिपोर्ट न देणे आदी कारणामुळे धर्मादाय आयुक्तांनी उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नोंदणी प्रमाणपत्र कार्यालयात जमा करावे असे 2018 साली आदेशित केले आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशन बेकायदेशीर आहे असा आरोप इंद्रजित देवकते यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
22 सप्टेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये इंद्रजित देवकते यांनी उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनमुळे जिल्ह्यातील गुणी खेळांडू राज्य पातळीवर खेळू शकत नाहीत. त्यामुळे पालकांचीही मोठ्या प्रमाणात ओरड आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशने उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनला क्रिकेटच्या खेळासाठी सुसज्ज मैदान घ्या यासाठी 40 लाख रूपये दिल होते. परंतु त्यांच्या निष्क्रियतेमुळे पैसे परत जावून मैदान ही झाले नाही. या क्रिकेट असोसिएशनमधील जे संस्थापक सदस्य आहेत त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
या संदर्भात सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात बऱ्याच तक्रारी केल्या. परंतु कार्यालय गांभिर्याने काही घेत नाही. या तत्कालीन असोसिएशनचे अध्यक्ष विजय दंडनाईक असून, सचिव दत्ता बंडगर आहेत. यावर्षीची निवड चाचणी जिल्ह्याच्या बाहेर बार्शी येथील शिराळा येथे ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बाहेरच्याच खेळाडुंना मोठ्यास प्रमाणात संधी मिळत असून, जिल्ह्यातील खेळाडुंची उपेक्षा होत आहे. यावेळी संदीप कठारे, बालाजी लोकरे उपस्थित होते.