धाराशिव (प्रतिनिधी)-मराठावाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या संस्कृती कार्य संचालनालयाच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर गाथा मुक्ती संग्रामाची यामध्ये निजामाने कुठे काय काय केले याचा लेखाजोखा मांडला आहे. हे नाट्य प्रयोग 25 सप्टेंबरपासून होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे धाराशिव शाखेचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

22 सप्टेंबर रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेस परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर चव्हाण व कोषाध्यक्ष सुरज सोनवणे उपस्थित होते. पुढे बोलताना विशाल शिंगाडे यांनी या सर्व नाट्य प्रयोगाची जबाबदारी प्रत्येक तालुक्यांच्या तहसीलदारांवर आहे. नाट्य प्रयोगाबाबत परवानग्या घेणे, नियंत्रण ठेवणे, पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवणे आदी जबाबदाऱ्या आहेत. तुळजापूर येथे 25 सप्टेंबर, कळंब येथे 26 सप्टेंबर, धाराशिव येथे 27 सप्टेंबर, भूम येथे 29 सप्टेंबर, वाशी येथे 30 सप्टेंबर, लोहाराय येथे 8 ऑक्टोबर, गुंजोटी ता. उमरगा येथे 9 ऑक्टोबर, परंडा येथे 10 ऑक्टोबर, भोकर जि. नांदेड येथे 11 ऑक्टोबर, अर्धापूर येथे 12 ऑक्टोबर या प्रमाणे दोन अंकी नाट्य प्रयोग होत आहेत. या नाटकाचे लेखक सतीश साळुंके व शैलश गोजनगुंडे असून, दिग्दर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव येथील नाट्य विभागप्रमुख गणेश शिंदे यांनी केले आहे. 


 
Top