परंडा (प्रतिनिधी) - मराठा समाजास आरक्षण द्यावे, या मागणीसह मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ परंडा तालुक्यातील भोत्रा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवार ( दि.13 ) रोजी लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले.मराठा समाजाला आरक्षण द्यावे,अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा यावेळी मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. माहितीस्तव परंडा तहसिल व परंडा पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले.