धाराशिव (प्रतिनिधी)-  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 75 वा वर्धापन दिन 17 सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. त्याअनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या देशी, विदेशी, एफएल-2/सीएलएफएलटिओडी-3/सीएल-3/एफएल-3/एफएलबीआर-2/ ताडी आदी अनुज्ञप्त्या 17 सप्टेंबर रोजी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे तसेच त्यावरील मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.


 
Top