धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन जनजागृती संस्था उस्मानाबाद संचलित पर्यटन विकास समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष युवराज नळे व सदस्य रविंद्र शिंदे यांचा सत्कार भारतीय संविधान उद्देशिका,फुलझाड व पेढे भरवुन सत्कार करण्यात आला.

अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर येथुन इतिहासकार व पुरातत्त्वज्ञ शाखेची पदवी युवराज नळे व रविंद्र शिंदे ए ग्रेड ने उत्तीर्ण झाले. ही बाब पर्यटन विकास समिती व धाराशिव करांसाठी गौरवणीय बाब आहे. दोघांनी मिळविलेले यश हे पर्यटन विकास समिती व जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी लाभदायक ठरेल. अब्दुल लतिफ, अभिमान हंगरगेकर, रणजीत रणदिवे यासह मान्यवरांनी आपापल्या मनोगतातुन शुभेच्छा व्यक्त केल्या. तर सत्कार केल्याबाबत युवराज नळे यांनी आभार व्यक्त करुन आज जागतिक पर्यटन दिवस असुन आपल्या पर्यटन विकास समितीच्या वतीने जिल्ह्याचे पर्यटन जगासमोर आणण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करुया. हा कार्यक्रम म. फुले चौकातील म.ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाजवळ घेण्यात आला. यावेळी युवराज नळे, रविंद्र शिंदे, अब्दुल लतिफ, अभिमान हंगरगेकर, रणजीत रणदिवे, गणेश रानबा वाघमारे, बाबा गुळीग, राजाभाऊ कारंडे, विजय गायकवाड, संग्राम बनसोडे, अरुण कांबळे, नवाब मोमीन, योगेश करपे अन्य इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबा गुळीग यांनी केले. तर आभार रणजीत रणदिवे यांनी मानले.


 
Top