वाशी (प्रतिनिधी)- प्राथमिक विद्या मंदिर कन्हेरी, जिल्हा परिषद शाळा सरमकुंडी,जिल्हा परिषद शाळा इंदापूर जिल्हा परिषद शाळा गोजवाडा ,संभाजी विद्यालय पिंपळगाव लिंगी, प्राथमिक शाळा जवळका, केंद्रीय कन्या प्रशाला वाशी, बाल संस्कार केंद्र वाशी, जय भवानी विद्यालय पारा, जि प प्रशाला सारोळा वाशी, या ठिकाणी वंचित विकास जाणीव संघटनेच्या वतीने बाल आनंद मेळावे घेण्यात आले यामध्ये व्यक्तिमत्व विकास संवाद कौशल्य नेतृत्व कौशल्य गुणवत्ता वाढीवर मार्गदर्शन करण्यात आले.
यानंतर मुला मुलींचे खेळ गाणी गोष्टी स्पर्धा घेण्यात आल्या शेवटी जिल्हा परिषद कन्या प्रशाला वाशी येथे समारोप करण्यात आला. यावेळी जाणीव संघटनेचे वंचित विकास संस्थेचे कार्यकर्ते रामभाऊ लगाडे मुख्याध्यापक धायगुडे ए. ए. अभिमन्यू गवळी कवडे एस.पी. काळे एस. एल. वाघोलीकर यांनी परिश्रम घेतले या बाल आनंद मेळाव्यात एक हजार ते दीड हजार मुलांनी सहभाग घेतला मेळावा उत्साहात पार पडला.