धाराशिव (प्रतिनिधी)-मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात शहीद झालेल्या भारतीय लष्करातील कॅवेलिये तीन बटालियनच्या जवानांच्या शहिदांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी आणि शहिदांच्या नातेवाईकांनी आज त्यांना तुळजापूर येथे स्मृतीस स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.  

13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो दरम्यान निजामाच्या सैन्याशी लढताना तुळजापूर येथे  झालेल्या युद्धात हुतात्मे  झालेले 3 कावेलरी रेजिमेंटचे जमादार हरिराज सिंग आणि जमादार मांगेराम यांच्या स्मृती स्तंभाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता तसेच यावेळी भारतीय सेनेतील युनिटचे सात जवानांनीही या दोन हुतात्म्यांना अभिवादन दिले यामध्ये सुभेदार संतप्रताप, हवालदार गजेंद्रसिंघ, नायक दलवीर सिंघ, नायक सत्विर सिंघ, लान्स नायक भारत सिंघ, लान्स नायक आशिष कुमार आणि लान्स नायक विकास चव्हाण आणि शहिदांचे नातेवाईक उपस्थित होते.यावेळी शहिदांच्या नातेवाईकांचा तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात सहभागी झालेल्या स्वतंत्र सैनिकांचा जिल्हा प्रशासन यांच्या वतीने सत्कारही करण्यात आला यावेळी तुळजापूरचे आमदार राणाजगजिसिंह पाटील उपस्थित होते.


 
Top