नळदुर्ग (प्रतिनिधी)-अखिल भारतीय विद्यार्थी परीषद देवगिरी प्रदेशाच्या वतीने काढण्यात आलेल्या मराठवाडा मुक्तीसंग्राम कृतज्ञता रथ यात्रेचे दि.14 सप्टेंबर रोजी नळदुर्ग शहरात जोरदार स्वागत करण्यात आले.

अखिल भारतीय विद्यार्थी परीषद देवगिरी प्रदेशाच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम कृतज्ञता रथ यात्रा काढण्यात आली आहे.ही रथ यात्रा 1 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील माहुर येथुन सुरू झाली आहे. माहुरहुन निघालेली ही रथ यात्रा हिमायतनगर, किनवट,भोकर, उमरी, बिलोली,देगलुर,मुखेड, नायगाव,कंधार, मोहा, नांदेड,मुदखेड, अर्धापुर,लोह, हदगाव, कळमनुरी,हिंगोली सेनगाव, औंढानागनाथ,वसमत, पुर्णा,पालम,गंगाखेड,राजुर, जळकोट, उदगीर,देवणी,निलंगा, लोहारा,उमरगा मार्गे नळदुर्ग येथे दि.14 सप्टेंबर रोजी पोहचली.या रथ यात्रेसोबत अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचे अजित केंद्रे (लातुर),सुशांत एकोर्गे (लातुर) यांच्यासह कार्यकर्ते होते. ही रथ यात्रा ज्या ठिकाणी हुतात्मा स्मारक आहे त्याठिकाणी जाऊन हुतात्म्यांना अभिवादन करून तेथे उपस्थित असणाऱ्या नागरीकांना मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनाचा इतिहास सांगत आहेत.

दि.14 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम कृतज्ञता रथ यात्रेचे नळदुर्ग येथील हुतात्मा स्मारकात आगमन झाले. यावेळी भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, भाजपाचे शहर अध्यक्ष धमाजी घुगे, माजी नगरसेवक विनायक अहंकारी, रोहीत मोटे, मोहीत कलकोटे, सागर हजारे, विशाल डुकरे यांनी रथ यात्रेचे स्वागत केले. यावेळी पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते कलश पुजा करण्यात आली. यानंतर अभाविपचे अजित केंद्रे यांच्या हस्ते स्मारकातील हुतात्मा स्तंभाचे पुजन करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मावळा ग्रुपचे मनोहर घोडके, स्वप्निल काळे, प्रसाद देशमुख, संतोष पाटील, सामाजिक कार्यकर्ते अमर  भाळे,ऍड. धनंजय धरणे आदीजण उपस्थित होते. यावेळी विनायक अहंकारी यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम आंदोलनातील नळदुर्गचे योगदान काय याबाबत मार्गदर्शन करून ही रथ  

 यात्रा काढल्याब अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचे कौतुक केले. भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार यांनी सर्वांची ओळख करून दिली. यानंतर ही रथयात्रा अणदुरकडे रवाना झाली वाटेत नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या हुतात्मा बाबुराव बोरगावकर व हुतात्मा निलय्या स्वामी यांना अभिवादन करून ही रथ यात्रा अणदुरकडे रवाना झाली.


 
Top