धाराशिव (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भावनेने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना लागू केल्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळत आहे पण धाराशिव जिल्ह्यातील शेकडो शेतकरी वर्ग केवायसी व आधार लिंक न केल्यामुळे केंद्र सरकारच्या मदतीपासून वंचित राहावे लागते बरेचसे शेतकरी यांना केवायसी व आधार लिंक कसे करावयाचे याची माहिती नसल्यामुळे त्यांना केंद्र सरकारची मदत मिळत नाही सरकारी अधिकारी, वर्तमानपत्र, सोशल मीडिया याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वारंवार कल्पनाही दिली जाते.
परंतु मात्र नेमकी याची प्रक्रिया अनेक शेतकऱ्यांना कशा पद्धतीने करावयाची त्याची माहिती नसल्यामुळे शेकडो शेतकरी किसान सन्मान निधी मिळण्यापासून वंचित आहेत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या गल्लीत, गावात, तालुक्यात मदतीपासून वंचित असणाऱ्या शेतकरी बांधवांशी संपर्क करून आपण शेतकऱ्यांशी बांधील आहोत या भावनेने शेतकऱ्यांचे केवायसी व आधार संलग्न करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली शेतकऱ्यांसाठीची योजना तळागळातील सर्वसामान्य गोरगरीब अठरापगड जातीच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पूर्व मराठवाडा संपर्कप्रमुख तथा धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामदास कोळगे यांनी केले आहे.