धाराशिव (प्रतिनिधी)-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'होऊ द्या चर्चा' ही संकल्पना संपूर्ण राज्यात व्यापक स्वरुपात राबविण्याचे ठरविले असून त्यादृष्टीने दि. 2 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईतील रंगशारदा सभागृहात सखोल मार्गदर्शनही केले.व याठिकाणी शंकरराव बोरकर यांची लातुर लोकसभा मतदारसंघाच्या निरिक्षकपदी निवड करण्यात आली.तसेच आपण स्वतः लातूर लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त गावे व प्रभागांमध्ये 'होऊ द्या चर्चा' कार्यक्रमांचे नियोजन व निरिक्षण करावे. अधिकाधिक ठिकाणी आपण स्वतः उपस्थित राहून आव्हाल पक्षश्रेष्ठींना सादर करावा.

या मतदारसंघातील संपर्कप्रमुख व जिल्हाप्रमुख यांचे मोबाईल क्रमांक आपणास देण्यात येत आहेत.वेबिनारद्वारे त्वरित बैठक घेऊन सूचना द्याव्यात व गावनिहाय कार्यक्रमांचे अंतिम नियोजन करावे. संदर्भ, मुद्दे व प्रचार साहित्याचा संच आपणास देण्यात येत आहे.त् यानुसार मतदार संघाचे निरिक्षण करावे.


 
Top