धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची जुलै ते सप्टेंबर 2023 या कालावधीमधील त्रैमासिक सभा 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त माहिती किंवा इतर स्त्रोताद्वारे शासकीय अधिकाऱ्यांविरुध्द तक्रारी किंवा अभिकथने पुराव्यासह संबंधित अधिकारी ज्या तालुक्यात कार्यरत आहे त्या तालुक्यातील भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे किंवा संबंधित विभागाच्या जिल्हा दक्षता समितीकडे अथवा संबंधित विभागाने, तालुकास्तरीय समितीने कार्यवाही केली नसल्यास जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य सचिव महादेव किरवले यांनी केले आहे.
जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे अर्ज सादर करताना तक्रारदाराने तालुका, जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे किंवा संबंधित विभागाच्या जिल्हा दक्षता समितीकडे सादर केलेल्या तक्रारी अर्जाची छायांकित प्रत व पुरावे सादर करणे आवश्यक आहे.