धाराशिव (प्रतिनिधी)- श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर, विभागीय कार्यालय धाराशिव यांच्या वतीने 2022-23 या आर्थिक वर्षी अपघाती मयत झालेल्या सभासदांच्या वारसदारांना आर्थिक मदत करण्यात आली.
कै. श्रीरंग काशिनाथ घाडगे हे हनुमान विद्यामंदिर, बंकलगी, ता.द.सोलापूर, जि.सोलापूर या ठिकाणी क्लार्क म्हणून कार्यरत होते. एका दुर्दैवी घटनेत त्यांचे अपघाती निधन झाले. कै.श्रीरंग काशिनाथ घाडगे हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेचे सभासद होते. ही पतसंस्था सभासदांचे कर्ज काढतेवेळीच त्यांचा विमा उतरवत असते. एखाद्या सभासदाचे दुर्दैवाने जर एखाद्या दुर्दैवी घटनेत अपघाती निधन किंवा नैसर्गिक निधन झाले असेल तर त्यांच्या वारसदारांना या योजनेचा लाभ होतो.
मराठवाडा विभागप्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, पतसंस्थेचे मराठवाडा विभागीय चेअरमन प्रा.डॉ.संदीप देशमुख, संचालक प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे, शाखाधिकारी श्री जीवन माने, तसेच शाखाप्रमुख श्री शिवाजी वागदकर, श्री रणजीत मुंढे यांच्या हस्ते कै.श्रीरंग काशिनाथ घाडगे यांच्या वारसदार श्रीमती मंजुश्री श्रीरंग घाडगे यांना विम्याची 1,92,510 रुपये रकमेचा चेक देण्यात आला. यावेळी मराठवाड्यातील सर्व शाखेतील गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.