धाराशिव (प्रतिनिधी) गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळ यांनी आज रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करून 30 ते 35 युवकाने रक्तदान केले .रक्तदान हे साठ वर्षाच्या आतील असावेत,  मुलीं मुलांच्या मध्ये कोणताही कसलाही आजार असता कामा नये ,वजन साधारणपणे 50 किलोच्या पुढे असावे . पांढरे डोळे व नखे  जास्त दिसत असेल व बी .पी .डायबेटीस किंवा कावीळ यासारख्या आजार असतील तर त्यांनी रक्तदान करणे योग्य नाही. रक्तदानाच्या या शिबिराला मंडळाच्या  मानाचा गणपती व धाराशिवचा महाराजा  श्रीच्या समोर रक्तदान शिबिराला सुरुवात, श्रीफळ वाढवून श्री च्या पूजेने करण्यात आली. यावेळी 30 ते 35 युवकांनी रक्तदान करून एक मंडळाची आदर्श परंपरा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान करून नव पिढीला एक आदर्श निर्माण केला आहे.

या  रक्तदान शिबिराला रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर लोंढे व तंत्रज्ञ राऊत ,पाटील सुर्यवंंशी नागरसोगे,अधि परिचारिका या सर्वांनी परिश्रम घेतले. मंडळाचे पदाधिकारी मनमत पाळणे, प्रा. गजानन गवळी, ॲड. अमोल दिवटे ,केदार उपाध्ये ,काशिनाथ दिवटे, बसवेश्वर पाळणे, विद्या साखरे इत्यादींनी परिश्रम घेऊन यशस्वी केले शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीतील या कर्मचाऱ्यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला ,रक्तदान  ,नेत्रदान, अवयव दान ,देहदान इत्यादी करणे म्हणजे आपण इतर रुग्णांना गरजे पोटी व त्यांचे दिव्यांग  घालवण्यासाठी  विविध जीवनमान ,जीवनदान यांनी आपले उधारीत्व निर्माण करणे  आहे. रक्तदान व अवयव दानाचे महत्त्व डॉक्टर लोंढे यांनी सांगून आवश्यकता मानव देहामध्ये जास्त आहे. सर्व रक्तपेढीतील  कर्मचाऱ्यांचा मंडळाच्या वतीने शैला मंडळाची श्री ची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला .यावेळी प्रा.भालचंद्र हुुच्चे यांनी संचलन व प्रास्ताविक मंडळाचे कार्याचे वैशिष्ट्ये उल्लेख करून सेवाभावी वृत्ती व दानशूर पणा हा सर्वांच्या मध्ये गुण निर्माण व्हावा असे सांगितले.उद्या दिनांक 27/09/2023 बुधवार  सायंकाळी 5=00वाजता अथर्वशीर्ष पठण  गीता पठण  15 वा अध्याय पठण  व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येत आहे.महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.


 
Top